**के.व्ही.के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय , घाटकोपर .
रचनावाद (माध्यमिक विभाग )**
मुंबई शहरात माध्यमिक विभागात रचनावाद उपयोगात आणणारी शाळा म्हणून के.व्ही.के. शाळा प्रसिद्ध आहे.
रचनावाद मूळ स्वतःच ज्ञान निर्मिती करत , प्रत्येक मुलं हे वेगळं आहे , स्वतंत्र आहे , शिकू शकतं. रोजच्या अनुभवातून शिकू शकते . अनुभव बदलले तर प्रत्येक मुलाचे शिक्षण बदलते, तत्वांवर नितांत श्रद्धा असल्याने विविध प्रयोग केले जातात. ' कृतिशील स्वयंशिक्षण' अशी व्यापक अर्थाने रचनावादाची व्याख्या केली जाते. त्याला अनुसरून प्रगत स्वरावर कृतीचा अर्थ तर्कशुध्द विचार , समाजाला जोडून विचार , मनन करावे , रवंथ करणे , चिंतन करणे इत्यादी क्रियांचा समावेश होतो. त्यानुसार शाळेत विविध उपक्रम केले जातात.
मेंदू आधारित शिक्षण :-
मेंदू आधारित शिक्षणामध्ये मुख्य उद्देश खेळ , क्रीडा हालचाली, संगीत कला ह्यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे मेंदू पोषण केले जाते. त्यासाठी शाळेतील प्रत्येक मूल कब्बडी, गोट्या, सागरगोटे, विटी-दांडू , लगोरी इत्यादी खेळ खेळते. शाळा एका अधिवेशनात असली तरी, दोन मधल्या सुट्ट्या दिल्या जातात जेणेकरून अधिक हालचाली करता येतील, जे मेंदू शिक्षणात खूप महत्वपूर्ण मानले जाते.
सहशालेय उपक्रम व दिनविशेष :-
सर्वसाधारण उपक्रमांबरोबरच मंगळागौरी, रक्षाबंधन, संस्कृत-दिन, कालिदास दिन, गुजराती दिन, साजरे केले जातात. त्याद्वारे विद्यार्थ्यांची भाषिक अभिव्यक्ती संवर्धित होती.
कृतियुक्त अध्ययन :-
कृतियुक्त अध्ययन आनंददायी वातावरण निर्मिती करते. रचनावादामध्ये वातावरण व अनुभव अत्यंत महत्वाचे आहेत. १० ते १६ वयोगटातील विद्यार्थी हे स्वतः विविध घटकांवर आधारित कृती युक्त साधने बनवितात. त्याद्वारे विविध अनुभव, ज्ञान निर्मिती होते. शैक्षणिक राखीवर भूमितीची सूत्रे दिसतात,शैक्षणिक पतंग बनवून विविध आकृत्यांचे आकार कापतात, मोजतात तर शैक्षणिक मुखवट्यांच्या माध्यमाने, अभ्यासक्रमातील 'पात्र' जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. शैक्षणिक फुलपाखरू, बनवून त्यावर कविता कोडी निर्माण केली जातात. शैक्षणिक रांगोळी काढताना विद्यार्थी स्वतः पायचे सूत्र वाचून त्यातील आशय, तथ्य, सिद्धांत, रांगोळीच्या माध्यमातून अभिव्यक्त करतात. शैक्षणिक मेहंदीच्या साहाय्याने अभ्यासात मागे असणाऱ्या मुलींच्या हातावर पाढे, शब्दार्थ,गणितीय सूत्रे इत्यादी काढले जातात व आनंदाने परत परत त्याचे वाचन केले जाते.
रचनावादी वर्कशीट्स :-
इयत्ता ५ वी ते ८ वी च्या मूल्यमापन पद्धतीत २०१६ पासून कृतिपत्रिकांचा समावेश केला आहे, त्याद्वारे अध्ययन माहितीची निर्मिती करून रचनावादी वर्कशीट्स बनविल्या आहेत. पहिल्या वर्षी या छापील स्वरूपात होत्या, या सध्या PDF स्वरूपात विद्यार्थ्यांना सरावासाठी दिल्या जातात.
बोलक्या भिंती :-
मुंबईतल्या बहुतांश शाळा दोन अधिवेशनात भरतात वर्गात प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विद्यार्थी बसतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांप्रमाणे रचनावादी वर्गखोल्या रंगीत करताना खूप मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी जिने, व्हरांडे चा उपयोग विविध नकाशे , आकृत्या ,कृतिपत्रिकेतील जाल रेखाचित्र, कथापूर्ती किंवा कथा तयार करण्यासाठी म्हणून रचनावादी रंगकाम करून बोलक्या भिंती साकारल्या आहेत. त्यावर विध्यार्थी अधिकाधिक काम करतात.
SWOT:-
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची बलस्थाने(s)कमतरता (w)संधी(O)आणि आव्हाने / अडथळे (T/C)यांचा अभ्यास (SWOT)शिक्षक करतात व त्याला जाणवणाऱ्या आव्हानांना प्रेरणादायी विविध संधी उपलब्द करून दिल्या जातात.
Art Based Therapy:-
अप्रगत विध्यार्थ्यांसाठी Art Based Therapy चा उपयोग खूप यशदायी ठरला आहे. Visual Arts, Drama Rhythm ह्या माध्यमांचा या Therapy मध्ये उपयोग केला जातो. ह्या Therapy मध्ये मूल ज्या पातळीवर आहे, ते जसेश तसे स्वीकारून, त्यास पुढे जाण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण केले जाते. मुलाचे कोणतेही क्लिष्ट विश्लेषण न करता मोकळेपाणाने अनुभव घेता येतो. त्यातून अगदी सहज विकास होऊन एक समृद्धपरिपक्व व्यक्तिमत्त्व साकारले जाते .
KVK APP:-
KVK School Application च्या साहाय्याने दैनंदिन अभ्यास, गृहपाठ, स्वाध्याय विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल वर पाठवले जातात.
अधिक माहितीसाठी प्राचार्य जगदीश इंदलकर 932435211